अनलॉकची नियमावली आज जाहीर होणार; पुणेकरांची उत्सुकता शिगेला!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 July 2020

कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे त्यांची चेन ब्रेक करण्यासाठी महापालिकेने १३ जुलैपासून दहा दिवसांसाठी शहरात लॉकडाऊन लागू केला होता. त्यामुळे गुरुवारी रात्री बारानंतर या लॉकडाऊनची मुदत संपुष्टात येत आहे.

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेने लागू केलेल्या लॉकडाऊनची मुदत आज (गुरुवार, ता.२३) रात्री बारा वाजता संपुष्टात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार (ता.२४) पासून शहरात काय सुरू राहणार आणि कोणती बंधने राहणार? याबाबतचे आदेश आज महापालिकेकडून जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

Breaking : गणेशोत्सवाबद्दल पुणे महापौरांनी घेतला महत्त्वाचा निर्णय; वाचा सविस्तर!​

कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे त्यांची चेन ब्रेक करण्यासाठी महापालिकेने १३ जुलैपासून दहा दिवसांसाठी शहरात लॉकडाऊन लागू केला होता. त्यामुळे गुरुवारी रात्री बारानंतर या लॉकडाऊनची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे शुक्रवारपासून शहरात काय सुरू राहणार आणि कोणती आणि कशावर बंधने येणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान, बुधवारी (ता.२२) दिवसभर महापालिका अधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. त्यामध्ये शहरात कोणत्या भागात कोरोनाचा प्रभाव वाढतो आहे, याचा आढावा घेऊन नव्याने कंटेन्मेंट झोन तयार करण्याचे काम दिवसभर सुरू होते. त्या संदर्भातील आदेश गुरुवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune unlock rules will be announced today declared by PMC Administration