
Latest Pune News: विहिरीच्या कडेला उभा केलेल्या ट्रॅक्टरची चावी फिरवल्याने ट्रॅक्टर सुरू होऊन थेट विहिरीत पडला. त्यामुळे ट्रॅक्टरवर बसलेले दीड वर्षीय मुलगी व चार वर्षांचा तिचा भाऊ दोघेही विहिरीत पडले.
यामध्ये मुलीचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे. शिंदवणे (ता. हवेली) येथील रेल्वे स्थानकाजवळील मुक्तार फॉर्म शेजारील शेतात शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.