esakal | लस अपुरी; पुण्यात फक्त ६८ केंद्रांवर आज लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

लस अपुरी; पुण्यात फक्त ६८ केंद्रांवर आज लसीकरण

sakal_logo
By
नामदेव कुंभार

पुणे - महापालिकेकडे कमी लस शिल्लक असल्याने कोव्हीशील्डचे ६२ लसीकरण केंद्र व कोव्हॅक्सीनचे ६ केंद्र सोमवारी खुले रहाणार आहेत. या केंद्रांवर १८ वयाच्या पुढील सर्वांचे लसीकरण केले जाईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. महापालिकेतर्फे कोव्हीशील्डचे सुमारे १९० केंद्रांवर लसीकरण केले जाते, पण महापालिकेकडे सुमारे साडे हजार डोस उपलब्ध आहेत, त्यामुळे केवळ ६२ केंद्रांवर लसीकरण होणार आहे. तर कोव्हॅक्सीनचे ६ केंद्र कायम आहेत.

कोव्हीशील्ड

- पहिल्या डोससाठी ४० टक्के लस आॅनलाइन बुकींगद्वारे

- पहिल्या डोससाठी २० टक्के लस थेट केंद्रावर उपलब्ध

- पहिला डोस ८४ दिवसांपूर्वी (१८ एप्रिल) घेतलेल्यांच्या दुसऱ्या डोससाठी २० टक्के लस आॅनलाइन

- थेट केंद्रावर येणाऱ्यांसाठी २० टक्के लस दुसऱ्या डोससाठी

कोव्हॅक्सीन

- ६ केंद्रांवर प्रत्येकी २०० डोस

- पहिल्या डोससाठी आॅनलाइन बुकिंग केलेल्या नागरिकांसाठी २० टक्के लस

- पहिल्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस

-१३ जून पूर्वी पहिला डोस (२८ दिवस) घेतल्याच्या दुसऱ्या डोससाठी ४० टक्के लस आॅनलाइन बुकींगद्वारे उपलब्ध

- दुसऱ्या डोससाठी थेट केंद्रावर जाणाऱ्यांसाठी २० टक्के लस उपलब्ध

loading image