
पुणे : पुण्यात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला ती मिळेल. लसीचा कोणताही तुटवडा नाही आणि तो होणार नाही, याची खबरदारी महापालिका प्रशासन घेत आहे.पुण्यासाठी लसीचे पुढील दोन दिवसांमध्ये एक लाख डोस उपलब्ध होतील.पुणे महापालिकेकडे सध्या ३० हजार डोस आहेत. ते पुढील दहा दिवस पुरणार असल्याचे महापालिकेने बुधवारी स्पष्ट केले. ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याचवेळी आरोग्य खात्यातील अधिकारी-कर्मचारीही लस टोचून घेत आहेत.
पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून लशीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र, लोकांच्या सोयीसाठी पुरेशा प्रमाणात लसीकरण केंद्र सुरू करून, त्याठिकाणी डोस उपलब्ध केले जात आहेत. मात्र काही केंद्रांवर लस मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याअनुषंगाने प्रत्येकाच्या मागणीनुसार वेळेतच लस देण्याचे नियोजन महापालिकेने केले असून, त्यासाठी पुढील काही दिवसांसाठी १ लाख डोस मागविले आहेत.सध्या रोज तीन ते सव्वातीन हजार जणांना लस दिली जात आहे. त्यासाठीचा साठा आहे. डोसची कमरता नसल्याचे आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे.
पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी; तब्बल १८ हजार जणांना सातवा वेतन आयोग लागू
''पुण्यात नियमानुसार प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला लस देण्यात येत आहे. यापुढच्या काळातही ती कमी पडणार नाही. त्यासाठी आगाऊ डोस मागविले आहेत. त्यानुसार लसीकरण केंद्रांवर ती उपलब्ध होईल''
- रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.