Mastani Lake water storage reduced this year
esakal
फुरसुंगी (जि. पुणे) : घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण घटल्याने आणि परतीच्या पावसाने ओढ दिल्याने वडकी येथील ऐतिहासिक मस्तानी तलावात यंदा क्षमतेपेक्षा ५० टक्के कमी पाणी साठले (Mastani Lake water level 50 percent low) आहे. अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे वडकी परिसरातील नागरिकांना यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.