Pune : बापरे! तब्बल एक तास पाण्यावर हालचाल न करता तरंगते ही मुलगी

कोरोनाच्या काळात अनेकांनी आपल्या कला जोपासल्या
Pune news
Pune newsesakal

Pune : कोरोनाच्या काळात अनेकांनी आपल्या कला जोपासल्या; जसे की चित्र काढणे, डान्स करून त्याचे रील करणे, नवनवीन पदार्थ करणे सगळ्यात जास्त केक तयार करणे; तर काहींनी नवीन कला शिकल्या जसं की दागिने तयार करणे, शिवणकाम, लोकरीच्या वस्तू, मायक्रम तर काहींना हा वेळ व्हिडिओ बघण्यात, पुस्तक वाचण्यात आणि स्वतःच्या फिटनेस कडे लक्ष देण्यात घालवला.

Pune news
Pune : सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथे भिषण अपघात

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मधल्या एका मुलीनेही आपल्या वडिलांकडून शिकत नवीन छंद जोपासला आहे. ते म्हणजे पोहणे. आता यात नवीन काय? आपण आपल्या आजूबाजूला पोहण्याचे अनेक प्रकार पाहतो.

Pune news
Pune Road Accident : ओव्हरटेक करताना पिकअपची दुचाकीला धडक

अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने पोहतात. पाण्यात पोहताना आणि तरंगताना दमछाक ही होतेच. पण जर अस म्हटल की पाण्यात न पोहता तरंगत रहायचं तर? अर्थात ही चेष्टा वाटू शकते; आपण काही कोणते प्राणी नाही हे पाण्यात कितीही वेळ न पोहता तरंगत राहू शकतील.

Pune news
Pune : तळजाई टेकडीवरील तोडलेल्या झाडांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर नेमकी तथ्ये काय ?

पण यालाच अपवाद वैष्णवीने केला आहे; वैष्णवी ही पाण्यात काही मिनिटे नाही तर तब्बल एका तासाहूनही जास्त वेळ अशीच तरंगत राहू शकते. वैष्णवी वाघ असं या मुलीचं नाव आहे. वैष्णवी आंबेगाव तालुक्यातील रांजणी या गावात राहते. लॉकडाऊन मध्ये आपल्या बाबांकडे हट्ट करून घराबाजूच्या विहरीत ती पोहायला शिकली.

Pune news
Pune : आंदोलनकर्त्यांकडून तळेगाव-चाकण महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

वैष्णवी रांजणी गावात मीरावस्तीत राहते, तिचे वडील सुधीर सोपान वाघ हे शेतकरी राहतात. रोजच्या सरावाने वैष्णवी पोहण्यात तरबेज झाली. पोहताना दम लागल्यानंतर ती उलटी होऊन पाण्यावर तरंगू लागली.

Pune news
Pune: पुण्यातून 'मेस्सी'चं अपहरण; घटना CCTVमध्ये कैद

हाच सराव करत असताना ती पाण्यावर आपल्या शरीराची कुठलीही हालचाल न करता बराच वेळ तरंगू लागली. आधी दोन मिनिटे, मग पाच आणि अस करत आता जवळपास एका तासाहूनही जास्त वेळ ती पाण्यात कोणतीही हालचाल न करता तरंगते.

Pune news
Pune: पुण्यातून 'मेस्सी'चं अपहरण; घटना CCTVमध्ये कैद

तिची ही पाण्यावर तरंगण्याची कला वेगळी असून त्यातच तिला करिअर करायचे आहे. आई-वडील दोघेही शेतकरी आहेत पण आपल्या मुलीची ही आगळी वेगळी कला पाहून त्यांनाही कौतुक वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com