Pune : वीर धरणातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी सोडणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

veer dam

Pune : वीर धरणातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी सोडणार

भोर : नीरा नदीवरील धरणाच्या साखळीतील नीरा-देवघर, भाटघर व गुंजवणी धरण शंभर टक्के भरले असल्यामुळे वीर धरणात येणा-या पाण्याची क्षमता वाढली आहे. त्यामुळे सोमवारी (ता.१३) दुपारी बारा वाजल्यानंतर केंव्हाही वीर धरणातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्केतेचा इशारा देण्यात आला आहे. ९.८३ टीएमसी पाणीक्षमता असलेल्या वीर धरणात सोमवारी सकाळी ९ वाजता ९५.६० टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणाच्या डाव्या कालव्यातून ८२७ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परंतु धरणात २१ हजार क्यूसेक्स ने पाणी येत आहे. त्यामुळे १२ वाजेपर्यंत धरणात १०० टक्के पाणीसाठा होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे १२ वाजल्यानंतर धरणाच्या दरवाजांमधून आणि डावा व उजवा अशा दोन्ही कालव्यांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. यावर्षी २४ जुलैला वीर धरण १०० टक्के् भरले होते. त्यावेळी धरणातून २२ हजार क्यूसेक्सने पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे यावेळीही धरणातून तेवढ्याच प्रमाणात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे अशी माहिती जलसंपदा विभागाचे साहाय्यक अभियंता विजय नलावडे यांनी दिली.

Web Title: Pune Veer Dam Will Once Again Release Large Amount Of Water

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune Newsveer dam