बटाटा, टोमॅटो, लसूण, शेवग्याच्या भावात घट

बटाटा, टोमॅटो, लसूण, शेवग्याच्या भावात घट

Published on

मार्केट यार्ड, ता. २५ : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २५) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती. मागणीच्या तुलनेत आवक जास्त झाल्याने टोमॅटो आणि शेवग्याच्या भावात घसरण झाली असून, काकडीच्या भावात वाढ झाली आहे, तर अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर होते.

परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, मध्यप्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे १२ ते १३ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, राजस्थानातून गाजर सुमारे १४ ते १५ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ३ ते ४ टेम्पो, भुईमूग कर्नाटक आणि गुजरातमधून प्रत्येकी एक टेम्पो, मध्यप्रदेश, राजस्थानातून मटार २५ ते २६ टेम्पो, कर्नाटक येथून पावटा ३ टेम्पो, तमिळनाडू येथून तोतापुरी कैरी १ टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे १० ते १२ टेम्पो तर इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाटा ३० ते ३५ टेम्पो , कांदा १७५ टेम्पो इतकी आवक झाली होती.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ५०० ते ५५० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो १० ते १२ हजार क्रेट, काकडी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२, ढोबळी १० ते १२ मिरची, तांबडा भोपळा १४ ते १५ टेम्पो, गाजर ३ ते ४ टेम्पो, घेवडा ५ ते ६ टेम्पो, पावटा ३ ते ४ टेम्पो, कांदा सुमारे १७५ टेम्पो आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : १००-१५०, बटाटा : ७०-१४०, लसूण : ५००-१२००, आले सातारी : ३००-५००, भेंडी : ३००-५००, गवार : ७००-१०००, टोमॅटो : १००-१५०, दोडका : ३५०-४५०, हिरवी मिरची : ५००-७५०, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २००-३००, काकडी : ४००- ४५०, कारली : हिरवी ४००-४५०, पांढरी : ३००-३५०, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-२००, कोबी : ७०- १४०, वांगी : २००-४००, डिंगरी : ३५०-४००, नवलकोल : १००- १२०, ढोबळी मिरची : ४००- ५००, तोंडली : कळी : ५००-५००, जाड : २००-२५०, शेवगा : ५००-१०००, गाजर : ५००-१०००, वालवर : २५०-३००, बीट : १००-२००, घेवडा : ३००-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ७००-९००, मटार : परराज्य मटार : २६० ते ३००, पावटा : ३००- ३५०, तांबडा भोपळा : १००-२५०, तोतापुरी कैरी : १८००-२०००, सुरण : २००- २२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.

कोथिंबिरीची एक लाख जुडींची आवक
कोथींबीर, शेपू, पुदिन्याच्या भावात वाढ झाली असून अन्य सर्वच पालेभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे एक लाख जुडी तर, मेथीची ६० हजार जुड्यांची तर हरभऱ्याची सुमारे १२ हजार जुड्या आवक झाली होती.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १२००-२०००, मेथी : ५००-८००, शेपू : ५००-१०००, कांदापात : १०००-१५००, चाकवत : ५००-८००, करडई : ३००-८००, पुदिना : ५००-१०००, अंबाडी : ५००-८००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५००-८००, चुका : ५००-८००, चवळई : ६००-१०००, पालक : ८००-१५००, हरभरा गड्डी ५००-१०००.

डाळिंब, मोसंबी, बोरे, पेरू, लिंबू महागले
मार्केट यार्डातील फळबाजारात डाळिंब, मोसंबी, बोरे, पेरू आणि लिंबाच्या भावात वाढ झाली असून अननस, संत्री, पपई, चिक्कू, कलिंगड आणि खरबुजाचे भाव स्थिर होते. फळबाजारात रविवारी (ता. २५) मोसंबी ४० ते ५० टन, संत्री ४० ते ५० टन, डाळिंब १५ ते २० टन, पपई ९ ते १० टेम्पो, लिंबाची सुमारे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड १० ते १२ टेम्पो, खरबूज ८ ते १० टेम्पो, चिक्कू २ हजार गोणी, पेरू ३०० तर ३५० क्रेट, अननस ६ ट्रक, बोरे ३०० ते ३५० पोती, इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : २५०-४५०, मोसंबी : (३ डझन) : १८०-५००, (४ डझन) : ३०-२७०, संत्री : (१० किलो) : २००-१०००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : १००-३००, आरक्त : २०-८०, गणेश : १०-४०, कलिंगड : १५-२०, खरबूज : १२- ३०, पपई : १२-२५, चिक्कू (दहा किलो) : १००-६००, पेरू (२० किलो) : ६००-७००, अननस (१ डझन): १००-६००, बोरे (१० किलो) : चमेली : ५५०-६२०, चेकनट : १३००-१४००, उमराण : १८०-२५०, चण्यामण्या : १०००- १२००.

फुलांना मागणी वाढली
फूल बाजारात सर्व फुलांची आवक वाढली आहे. रथसप्तमी आणि प्रजासत्ताक दिनामुळे मागणी वाढल्याने भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती फुलव्यापारी सागर भोसले यांनी दिली.
फुलांचे प्रतिकिलोचे भाव पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-६०, गुलछडी : १५०-२००, अ‍ॅष्टर : जुडी ३०-५०, सुट्टा १००-१५०, कापरी : ६०-१००, शेवंती : ६०-१२०, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : ३०-६०, गुलछडी काडी : ५०-१५०, डच गुलाब (२० नग) : १५०-३००, जरबेरा : ४०-६०, कार्नेशियन : १५०-२५०, शेवंती काडी १५०-३००, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, ऑॅर्चिड ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०, जिप्सोफिला : २५०-३५०, लिली बंडल : १४-२०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com