

Pune records 16,309 new vehicle registrations, including 2,420 electric vehicles, during the Diwali period.
esakal
पुणे, : दिवाळीच्या मुहूर्तावर पुणेकरांनी नवीन वाहन खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, गेल्या दहा दिवसांत शहरात १६ हजार ३०९ नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे. वाढत्या इंधनदरामुळे नागरिकांचा कल ई-वाहनांकडे वाढला असून, एकूण खरेदीत दोन हजार ४२० ई-वाहनांचा समावेश आहे.