Pune News : पुण्यात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान काळेपडळमध्ये पथकावर विटांचा मारा, तर विमाननगरमध्ये बेकायदा जाहिरात फलक लावणाऱ्या आठ जणांवर गुन्हा

Pune Municipal Corporation Encroachment Action : पुण्यात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान काळेपडळमध्ये कर्मचाऱ्यांवर विटांचा मारा करण्यात आला, तर विमाननगरमध्ये अनधिकृत जाहिरात फलक लावल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
Pune Municipal Corporation Encroachment Action

Pune Municipal Corporation Encroachment Action

esakal

Updated on: 

पुणे : शहरातील अतिक्रमणांविरुद्ध महापालिकेने कठोर भूमिका घेतली असतानाच, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नियमांचे उल्लंघन आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. काळेपडळ येथे अनधिकृत शेड पाडण्याच्या कारवाईदरम्यान एका दुकानदाराने पथकावर विटा फेकून मारल्याने दोघे जखमी झाले. तर विमाननगर परिसरात बेकायदा फलकबाजी केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेची परवानगी न घेता झाडे, सार्वजनिक भिंती आणि विजेच्या खांबांवर जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी आठ जाहिरातदारांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...