पुणे - पुणे जिल्ह्यात एसआयआर प्रक्रिया अंतिम टप्प्यात; ९९.९९ टक्के एन्युमरेशन फॉर्मचे वितरण पूर्ण

पुणे - पुणे जिल्ह्यात एसआयआर प्रक्रिया अंतिम टप्प्यात; ९९.९९ टक्के एन्युमरेशन फॉर्मचे वितरण पूर्ण
Published on

पुणे जिल्ह्यात ‘एसआयआर’ प्रक्रिया अंतिम टप्प्यात

९९.९९ टक्के ‘एन्युमरेशन फॉर्म’चे वितरण पूर्ण

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : जिल्ह्यात विशेष पुनरिक्षण प्रक्रियेअंतर्गत (एसआयआर) मतदारांच्या एन्युमरेशन फॉर्मच्या वितरणापासून ते डिजिटायझेशनपर्यंतची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जिल्ह्यातील तब्बल ९० लाख ८० हजार १७३ मतदारांना एन्युमरेशन फॉर्मचे वाटप करण्याचे काम ९९.९९ टक्के पूर्ण झाले असून, ९९.९४ टक्के फॉर्मचे डिजिटायझेशनही पूर्ण झाले आहे.

दरम्यान, या प्रक्रियेदरम्यान मतदारांच्या जुन्या व सध्याच्या नोंदींमध्ये आढळलेल्या तफावतींच्या ७ लाख २५ हजार ४९ अॅनोमलीज समोर आल्या असून, संबंधित मतदारांना सुनावणीची संधी देण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील एसआयआर अंतर्गत एन्युमरेशन फॉर्म वितरणाची मोहीम आता पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात एकूण ९० लाख ८० हजार १७३ मतदार असून, त्यांना फॉर्म वाटपाची प्रक्रिया जवळपास शंभर टक्के पूर्ण झाली आहे. फॉर्मचे डिजिटायझेशनही अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत ९९.९४ टक्के फॉर्म डिजिटल करण्यात आले आहेत.

--- चौकट ---
सात लाखांवर विसंगती...
वय, नाव अथवा मॅपिंगमधील तफावतींमुळे ॲनोमली डिजिटायझेशनच्या प्रक्रियेत ७ लाख २५ हजार ४९ विसंगती (ॲनोमलीज) आढळून आल्या आहेत. २००२ मधील मतदाराच्या नोंदीतील वय आणि सध्याच्या नोंदीतील वय यामध्ये अपेक्षित ताळमेळ नसणे, नावामध्ये काही चूक असणे किंवा मॅपिंगच्या प्रक्रियेत त्रुटी राहणे, अशा विविध कारणांमुळे विसंगती निर्माण होऊ शकते. विशेषतः मॅपिंग करताना दोन भावंडांमधील वयाचा फरक नऊ महिन्यांपेक्षा कमी दाखविला गेल्यासही सॉफ्टवेअरमध्ये विसंगती निर्माण होऊ शकते. त्यामुळे विसंगती आढळली म्हणजे संबंधित मतदाराची नोंद चुकीचीच आहे, असे गृहीत धरले जाणार नाही. अशा सर्व प्रकरणांची सुनावणी घेऊन आवश्यक ती पडताळणी केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com