

पुणे, ता. २१ : मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत नाव वगळलेल्या किंवा दुरुस्ती आवश्यक असलेल्या मतदारांना सुनावणीसाठी नोटीस बजावण्यात येणार आहे. सुनावणीवेळी मतदारांनी मूळ कागदपत्रे सोबत आणणे बंधनकारक असून, संशयास्पद कागदपत्रांची विविध सरकारी विभागांमार्फत कडक पडताळणी केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुधारित वेळापत्रकानुसार, ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या काळात दावे व हरकतींवर सुनावणी होईल. यासाठी सहा समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्र किंवा मंडळ अधिकारी कार्यालयात सुनावणीची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे ठिकाण मतदाराच्या घरापासून दोन किलोमीटरच्या परिघात असावे, अशी सूचनाही डुडी यांनी केली. सुनावणी प्रक्रियेसाठी सहा विशेष पथके कार्यरत राहतील. ही पथके पुरावे तपासणे, २००२ च्या यादीतील नाव पडताळणे, नातेवाईकांशी मॅपिंग करणे आणि निर्णयाची प्रत ऑनलाइन अपलोड करणे ही कामे करतील. मतदारांनी सादर केलेली कागदपत्रे आणि सुनावणीचा रोजनामा सुरक्षित ठेवण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.