मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेची जबाबदारी विभागीय आयुक्तांवर

मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेची 
जबाबदारी विभागीय आयुक्तांवर
Published on

पुणे, ता. ३ : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत एक ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीत सुधारणा करण्यासाठी उपाययोजना सुचविणे, तसेच त्याबाबतचा अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगास सादर करण्यासाठी विभागीय आयुक्तांची ‘मतदार यादी निरीक्षक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार दावे व हरकती दाखल करण्याच्या कालावधीत दावे व हरकती निकाली काढण्याच्या कालावधीत प्रथम भेट, मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धीच्यावेळी द्वितीय भेट, तर पडताळणी मतदार यादी निरीक्षक यांच्याकडून करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मतदार यादी निरीक्षक यांचा पुणे जिल्हा भेटीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार १० सप्टेंबर रोजी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस पुणे जिल्ह्यातील सर्व राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, विधानसभा सदस्य, तसेच मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष अथवा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने राजकीय पक्षांना काही सूचना अथवा अडचणी असल्यास त्या बैठकीपूर्वी सादर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

मतदार तक्रारींसाठी स्वतंत्र अधिकारी
मतदार यादी निरीक्षक यांच्या पुणे जिल्हा भेटीदरम्यान मतदार नोंदणी, तसेच मतदार यादीच्या अनुषंगाने नागरिकांच्या तक्रारी दाखल करून घेण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच, भेटीच्या कालावधी व्यतिरिक्त मतदार नोंदणीसंदर्भातील अडचणी व तक्रारी नोंदविण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पोर्टल, तसेच जिल्हास्तरावरील कॉल सेंटर क्रमांक १९५० उपलब्ध आहे. मतदारांनी मतदार यादीतील नोंदणी, दुरुस्ती अथवा इतर अडचणींबाबत आपल्या तक्रारी, सूचना संबंधित यंत्रणेकडे नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com