

Voter List
पुणे : मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) हे नगरसेवकांच्या कार्यालयात बसून सुरू असले तरीही प्रशासनाला या कामाचा वेग वाढवता आलेला नाही. अनेक कर्मचारी संथ गतीने काम करत असल्याने पुण्यात केवळ ५५ टक्के काम झाले आहे. एका आठवड्यात तब्बल ४५ टक्के काम पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. दरम्यान, हे काम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, बचत गटांचे सहकार्य घ्या, अशा सूचना आज स्थायी समितीमध्ये देण्यात आल्या आहेत.