
पुणे : पुण्यासह मुंबईत ई-बाइक टॅक्सीची सेवा सुरू होण्यासाठी विलंब होणार आहे. राज्यात चार कंपन्या इच्छुक आहेत. त्यांनी ॲग्रिग्रेटर परवाना मिळण्यासाठी तसा प्रस्तावही दिला आहे. मात्र, त्यात त्रुटी आढळल्याने परिवहन विभागाने तो रद्द करून फेरप्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी आणखी वेळ लागणार असून, पुण्यात ई-बाइक टॅक्सीच्या प्रवासाला विलंब होणार आहे.