

Pune Investment Fraud Case: Investors Cheated of Rs 1.38 Crore
sakal
पुणे : विविध गुंतवणूक योजनांमध्ये आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची एक कोटी ३८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार वानवडी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात छत्रपती संभाजीनगर येथील तीन संशयित आरोपींविरुद्ध 'महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण कायद्यान्वये' (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.