आळंदी : पुणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अधिपत्याखाली फेब्रुवारी महिन्यात आळंदी, डुडुळगाव आणि केळगाव परिसरातील सुमारे १६८ वारकरी शिक्षण संस्थांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या असून, अनेक संस्था नियम व परवानग्यांशिवाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.