पुणे : वॉर्ड रचना पुन्हा बदलणार?

मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत निर्णय घेणार : पवार
Ajit Pawar
Ajit PawarSakal

पुणे : ‘‘आगामी महापालिका निवडणुकांच्या वॉर्ड रचनेसंदर्भात थोडे थांबा. पुढील बुधवारी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत तुम्हाला याबाबतचा पक्का निर्णय कळेल,’’ असे सूचक वक्तव्य पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केले. त्यामुळे पुन्हा एकदा वॉर्ड रचना बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महापालिका निवडणुका तीन सदस्यांचा एक प्रभाग या पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रदेश कॉंग्रेसने या निर्णयाचा विरोध केला होता. महापालिका निवडणुकांसाठी दोन सदस्यांचा एकच प्रभाग करण्याची मागणी त्यांनी केली होती. तर दोन सदस्यांचा एक प्रभाग असावा, अशी भूमिका पहिल्यापासून राष्ट्रावादी कॉंग्रेसने घेतली आहे. असे असताना तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय झाल्यानंतर त्यावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली होती.

Ajit Pawar
युपीएससी परीक्षेत विदर्भाच्या विद्यार्थ्यांचे यश

कोरोनाची आढावा बैठक घेण्यासाठी शुक्रवारी पवार पुण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वॉर्ड रचनेसंदर्भात विचारले म्हणाले, ‘‘आमच्या सहकारी पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे. ती त्यांनी त्यांच्या पक्षाच्या व्यासपीठावर मांडली आहे. सर्वांशी समन्वय साधून मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतली. पुढील बुधवारी होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होईल. वॉर्ड रचनेबाबत कोणताही वाद होणार नाही. ज्यांना न्यायालयालयात जायचे ते जाऊ शकतात.’’

निवडणूका आयोगाने जिल्हा परिषदांच्या निवडणूका पुढे ढकलण्यास नकार दिला आहे. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले,‘‘निवडणूक आयोग त्यांचे काम करीत आहे. ती स्वायत्त संस्था आहे. त्यांना त्यांचा अधिकार आहे. त्यांचे ते भूमिका घेऊ शकतात.’’

जमीन गैरव्यहारातील खरा चेहरा समोर आणा

माजी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने बनावट आदेश तयार करून हडपसर येथील वनजमीन बळविण्याच्या प्रकरणात आता पालकमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. ‘कोणत्याही दबावाला बळी न पडता निरपेक्ष भावनेने याची चौकशी करा. यामागे कोणाचा खरा चेहरा आहे, तो समोर आला पाहिजे,’ अशा शब्दांत शुक्रवारी पवार यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सूचना दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com