esakal | Pune: मुसळधार पावसाने वारजे झाले चक्काजाम
sakal

बोलून बातमी शोधा

वारजे झाले चक्काजाम

पुणे : मुसळधार पावसाने वारजे झाले चक्काजाम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वारजे : अचानक आलेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे वारजे येथील महामार्गांवर वाहनांची मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे महामार्गावरील वाहने सेवा रस्त्यावर उतरल्याने संपूर्ण वारजेतील रस्ते चक्काजाम झाले आहेत. त्यामुळे वारजेकरांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे.

साडेपाच वाजता अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही कळायच्या आत सर्वच रस्त्यावर पाणी आले. यामध्ये येथील महामार्गांवर काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहनाचा वेग मंदावला. यामध्ये कार्यालय सुटण्याची वेळ असल्याने मोठया प्रमाणात वाहने रस्त्यावर आली. त्यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे अनेक वाहने महामार्ग सोडून सेवा रस्त्यावर आली. मात्र हे रस्ते अरुंद असल्याने काही वेळातच संपूर्ण रस्तेच चक्काजाम झाले. त्यामुळे वारजेकारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

loading image
go to top