Pune : वारजे माळवाडीतील मोबाईल शॉपीला मध्यरात्री आग

वारजे माळवाडी येथील मुख्य रस्त्यावरील एसएम मोबाईल शॉपीला शुक्रवारी मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग
Pune Warje Malwadi SM Mobile Shop Fire
Pune Warje Malwadi SM Mobile Shop Fire

खडकवासला : वारजे माळवाडी येथील मुख्य रस्त्यावरील एसएम मोबाईल शॉपी याला शुक्रवारी मध्यरात्री पावणेबारा ते बारा वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने दुकान बंद असल्याने जीवितहानी टळली. हे दुकान नवीन मोबाईल विक्री व रिपेअरिंग करण्याची शॉपी होती. सुमारे 200 स्केअर फूट या दुकानातील नवीन मोबाईल कव्हर, चार्जर, असे अन्य साहित्य व वस्तू जळाल्या आहेत.

वारजे येथील चौधरी अग्निशमन केंद्रातील वाहन वेळेत घटनास्थळी दाखल झाले. त्याने तातडीने आग विझवली. जळीत दुकानाच्या बाजूच्या शेजारील दोन दुकानाचे बाहेरील नाम फलक आग लागली होती. वेळेत अग्निशमन यंत्रणा पोचल्याने पुढील दुकानाचे नुकसान टळले जळीत दुकानात उंदीर मृत अवस्थेत सापडला आहे. त्यामुळे, ही आग उंदराने इलेक्ट्रिक वायर कूरतुडल्याने आग लागल्याची चर्चा होती. दिवाळी निमित्ताने दुकानात विक्री नवीन मोबाईल आणि अन्य माल भरला होते. असे दुकानदाराने सांगितले. वारेज माळवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोचले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com