Pune Warje salon firing incident today
esakal
पुणे : वारजे परिसरातील चैतन्य चौकात शुक्रवारी सायंकाळी सलूनमध्ये गोळीबाराची घटना (Pune salon firing incident Warje) घडली. या घटनेत केस कापत असताना निहाल शिंदे याच्या डाव्या कानाजवळ गोळी लागून तो जखमी झाला असून, अमोल आढाव हाही जखमी झाला आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.