धायरीजवळील कॅनाॅलमध्ये पोहताना १५ वर्षाचा मुलगा गेला वाहून

दुपारच्या सुमारास पोहताना हा मुलगा वाहून गेला आहे.
canol
canolSakal

धायरी : धायरी फाट्या जवळील कॅनॉल मध्ये पंधरा वर्षाचा मुलगा वाहून गेल्याची घटना आज दुपारी घडली आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून शोधमोहिम सुरु आहे.

दीपक मारुती बळकटे असे या अल्पवयीन मुलाचे नाव असून ते दुपारी साधारण १ वाजण्याच्या सुमारास त्याच्या मित्रासोबत पोहण्याचा सराव करत होते. त्याच्या अल्पवयीन मित्र आणि तो असे दोघेजण तेथे होते. नंतर पोहत असताना हा मुलगा वाहून गेला आहे. मुलाचे वय १५ वर्षे असून नऱ्हे येथील खेडेकर काॅर्नर येथे तो राहत होता. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली असून अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी शोधकार्य चालू केले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com