जिल्ह्यातील जलसंधारणाची कामे ठप्प

जिल्ह्यातील जलसंधारणाची कामे ठप्प
Published on: 

मंचर, ता. १८ : मृद व जलसंधारण विभागातील १८ स्थापत्य अभियंते संपावर गेल्याने पुणे जिल्ह्यातील दुष्काळ निवारणाची महत्त्वपूर्ण कामे ठप्प झाली आहेत. ओढे-नाल्यांचे खोलीकरण, तलाव व बंधाऱ्यातील गाळ काढणे, अंदाजपत्रके तयार करणे आणि जिल्हाधिकारी मंजुरीची प्रक्रिया यामुळे रखडली आहे. यामुळे पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अभियंत्यांच्या संपामुळे येरवडा येथील जिल्हा जलसंधारण कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे थांबले असून, कार्यालयात शुकशुकाट आहे. उपलब्ध कर्मचाऱ्यांसह आपण हतबल असल्याचे कार्यकारी अभियंता कपिल बिडगर यांनी सांगितले. अनेक गावांच्या सरपंचांनी सादर केलेले ओढे, तलाव व बंधाऱ्यांतील गाळ काढण्याचे प्रस्ताव मंजुरीअभावी कार्यालयातच पडून आहेत.
प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा किंवा रोजगार हमी योजनेसारख्या पर्यायी मार्गांनी कामे सुरू करावीत, अशी मागणी आंबेगाव पंचायत समिती सदस्य नीलेश टेमकर आणि तांबडेमळा सरपंच प्राजक्ता तांबडे यांच्यासह जिल्ह्यातील सरपंचांनी केली आहे.

अभियंत्यांच्या प्रमुख मागण्या
सुधारित आकृतिबंध रद्द करून २९ मे २०१७ चा मूळ आकृतिबंध लागू करावा.
सार्वजनिक बांधकाम व जलसंपदा विभागाप्रमाणे सेवाप्रवेश नियमावली लागू करावी.
इतर विभागांतील कर्मचाऱ्यांचे थेट समावेशन व प्रतिनियुक्तीवरील नियुक्त्या बंद कराव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.