
Pune Water Crisis
Sakal
पुणे : गुलटेकडी येथील ढोलेमळा सहकारी गृह रचना सोसायटीला गेल्या अनेक दिवसांपासून अपुरा पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी स्वारगेट येथील कार्यालयावर हंडामोर्च काढला. यावेळी सोसायटीच्या संचालकांनी व सभासदांनी स्वारगेट पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश जाधव यांना निवेदन देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.