Pune Water Crisis: पुण्यात पाणीकपात; मात्र बचतीचा फज्जा; गळतीसह अपव्यय रोखण्यासाठी महापालिकेकडे ठोस कृती आराखड्याचा अभाव

Water Conservation and Pune Water Crisis : पुणे शहरात १० टक्के पाणीकपात लागू करून दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जात असताना, पाणीगळती रोखणे, एसटीपीच्या पाण्याचा पुनर्वापर आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अंमलबजावणीकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे
Pune Municipal Corporation faces questions over water leakage and inadequate water conservation measures amid a 10 percent water cut.

Pune Municipal Corporation faces questions over water leakage and inadequate water conservation measures amid a 10 percent water cut.

esakal

Updated on: 

पुणे : जलसंपदा विभागाकडून उपलब्ध होणाऱ्या पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी महापालिकेने शहरात १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यानुसार दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. नागरिकांच्या पाणी वापरावर निर्बंध आणले जात असताना, दुसरीकडे पाणीबचतीसाठी आवश्यक ठोस उपाययोजना राबविण्यात महापालिकेला अद्याप यश आलेले नाही. पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करण्यापलीकडे पाण्याचा अपव्यय रोखणे, वितरण व्यवस्थेतील गळती थांबविणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी प्रभावी नियोजन होत नसल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...