Pune Water Cut : पुण्यावर पाणीकपातीची टांगती तलवार राज्याच्या सूचना ; टप्प्याटप्प्याने १० टक्के कपात

Pune Faces Possibility of 10% Water Cut : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धरणांतील पाणीसाठा ऑगस्ट २०२७पर्यंत पुरवण्यासाठी टप्प्याटप्प्याने १० टक्के पाणी कपातीचा विचार सुरू आहे.
Pune Water Cut

Pune Water Cut

esakal

Updated on: 

पुणे : राज्यातील दुष्काळ परिस्थिती विचारात घेऊन धरणांतील सध्याचा पाणीसाठा पुढील वर्षी ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेल, अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना राज्य शासनाने जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व शहरांसह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत टिकविण्यासाठी टप्प्याटप्प्याने १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांतील पाणीपुरवठ्यात भविष्यात कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अपुरा पाऊस, धरणात कमी असलेला पाणीसाठा आणि राज्यात जाहीर केलेला दुष्काळ या सर्व पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्याचे काम सरकारने गांभीर्याने घेतले आहे. या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची मुंबईत बैठक झाली. त्यात जलसंपदा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना याबाबतच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘‘मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत अनेक सदस्यांनी सध्याच्या परिस्थितीचा विचार करून आत्तापासूनच १० टक्के पाणीकपात करण्याची सूचना केली.

शहर आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत आगामी काळात कायम राहावेत, यासाठी उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यानुसार जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एकनाथ डवले यांना आवश्यक अभ्यास व उपाययोजनांच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन बांधकामांवर मर्यादा? पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन कपातीचे टप्पे निश्चित केले जाणार आहेत. ज्या भागात आगामी महिनाभरात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे, त्या भागात परिस्थिती अधिक गंभीर मानून नवीन घरांच्या तसेच बांधकामांवर मर्यादा आणता येईल का, याचाही विचार सुरू असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

पुढील बैठकीत अंतिम निर्णय पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता आगामी काळात काही भागांत पाणीकपात करावीच लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, कपात नेमकी कुठे आणि किती करायची, हे त्या-त्या भागातील पाणीसाठा, भौगोलिक परिस्थिती आणि टंचाईची तीव्रता यानुसार टप्प्याटप्प्याने निश्चित केले जाणार आहे. उपसमितीच्या पुढील बैठकीत याबाबतच्या अभ्यासाचा आढावा घेऊन पुढील निर्णय होणार असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com