

Pune Water Supply News PMC Implements 10 Percent Water Cut From October 15 With No Water Supply Every Thursday
sakal
पुणे : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या १० टक्के पाणीकपातीच्या आदेशाची महापालिकेने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यानुसार शहरात प्रत्येक गुरुवारी संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, पुणेकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.