

Pune Water Resources Department Directs Government and Private Entities to Reduce Water Consumption Amid Storage Concerns
esakal
पुणे: पावसाळ्यापर्यंत पाणीसाठा पुरविण्याचे आव्हान लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने पुणे जिल्ह्यातील आत्तापर्यंत ३८ शासकीय आणि खासगी संस्थांना पाणी कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये १९ शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित यंत्रणा तर १९ खासगी संस्था व ग्राहकांचा समावेश आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांसह औद्योगिक क्षेत्रे, ग्रामपंचायती, शैक्षणिक संस्था, कारखाने आणि विविध आस्थापनांना पत्रांद्वारे या सूचना देण्यात आल्या आहेत. पाणी कपातीचे पालन न करणाऱ्या संस्थांची माहिती जलसंपदा विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडण्यात येणार आहे.