

Katraj
esakal
कात्रज: पुण्याच्या दक्षिण उपनगरांत सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईचा फटका आता थेट गृहनिर्माण संस्थांच्या अर्थकारणाला बसत आहे. महापालिकेच्या दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे अनेक सोसायट्यांना दररोज खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे त्यांच्या मासिक देखभाल खर्चात दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. परिणामी, हा आर्थिक बोजा थेट सभासदांच्या खिशावर पडणार आहे.