

Pune News
esakal
पुणे: पश्चिम महाराष्ट्रात मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी उन्हाचा चटका वाढल्याने पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका पुणे आणि सातारा जिल्ह्याला जाणवू लागला आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील १६ तालुक्यांमधील ७४ हजारांहून अधिक लोकसंख्येला ४९ विंधन विहीरी आरक्षित करून ५३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची, माहिती विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आली.