Pune Water Supply : बुधवारी कोथरुड, एसएनडीटी, डेक्कन परिसरातील पाणी पुरवठा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water supply stop

Pune Water Supply : बुधवारी कोथरुड, एसएनडीटी, डेक्कन परिसरातील पाणी पुरवठा बंद

पुणे : शहरातील एसएनडीटी भागातील पाण्याच्या टाक्‍यांना, जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी फ्लो मीटर बसविण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील पाणीपुरवठा येत्या बुधवारी (ता.1) बंद राहणार आहे.

पुणे महापालिकेच्या समान पाणी पुरवठा प्रकल्पाअंतर्गत शहराच्या विविध भागातील पाण्याच्या टाक्‍यांना, जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी फ्लो मीटर बसविण्यात येणार आहे. त्यानुसार, एसएनडीटी भागात फ्लो मीटर बसविण्याचे काम महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने हाती घेतले आहे.

त्यानुसार, बुधवारी (ता.1) रोजी व दुसऱ्या दिवशी संबंधित परिसरातील पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे.

पाणी पुरवठा बंद राहणारा परिसर; एसएनडीटी परिसर

प्रभात रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता, एरंडवणे, नवसह्याद्री सोसायटी, मयुर कॉलनी, डेक्कन परिसर, कोथरुड, संगम प्रेस रोड, करिश्‍मा सोसायटी, हॅपी कॉलनी, सहवास सोसायटी, कर्वेनगर परिसर, म्हात्रे पुल ते राजाराम पुल, श्रीमान सोसायटी परिसर, मनमोहन सोसायटी परिसर, कर्वे पुतळा परिसर, आयडीयल कॉलनी परिसर, पौड रस्ता, भांडारकर रस्ता.