Pune : वीज पुरवठा खंडीत झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत

सोमवारी सकाळी आठ ते साडेनऊ असा जवळपास दीड तास या जलकेंद्राचा वीज पुरवठा बंद असल्याने ही पेठांसह इतर भागातील पाणी पुरवठा विस्कळित झाला.
Pune light
Pune lightsakal
Updated on

पर्वती जलकेंद्रातील वीज पुरवठा खंडित झाल्याने मध्यवर्ती पेठांसह इतर भागातील पाणी पुरवठा सोमवारी विस्कळित झाला. अनेक भागात पाण्याचे वेळापत्रक बिघडलेच पण कमी दाबाने पाणी आल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

पर्वती जलकेंद्रातून शहरातील सर्व मध्यवर्ती पेठांसह, शिवाजीनगर, आणि चतुःश्रृंगी पाणी पुरवठा विभागास पाणी दिले जाते. या जलकेंद्रातून शहराचा सुमारे ५० टक्के भाग व्यापला जातो. त्यामुळे या जलकेंद्रावरील वीज पुरवठा खंडित झाला पाण्याच्या टाक्या पूर्ण भरत नाहीत. त्यामुळे निम्म्या शहराचा पाणी पुरवठा विस्कळित होतो.

Pune light
Mumbai : 'टॉवरच्या आत टॉवर' मुंबईत टाटा पॉवरचे इन्होवेशन, मुंबईत ११० केव्ही पॉवर ट्रान्समिशन टॉवर्स उभारले

सोमवारी सकाळी आठ ते साडेनऊ असा जवळपास दीड तास या जलकेंद्राचा वीज पुरवठा बंद असल्याने ही पेठांसह इतर भागातील पाणी पुरवठा विस्कळित झाला. त्याचा काही परिणाम लष्कर जलकेंद्रावरील पाणी पुरवठ्यावरही झाला.

Pune light
Mumbai : वांद्रे पश्चिममधील जागेत म्हाडा उभारणार व्यावसायिक संकुल

पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, सकाळी वीज बंद मुळे पाणी पुरवठा विस्कळित झाल्याने शहरातील सर्व पेठांमध्ये दुपारनंतर पाणी देण्यात आले. तर काही भागात सायंकाळी उशिरा पाणी देण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.