

Khadakwasla Project Storage Drops By 2.35 TMC Pune Water Supply Under Pressure As 10 Percent Water Cut May Be Implemented
sakal
पुणे: शहराच्या वर्षभराच्या पाणीपुरवठ्याचा आधार असलेल्या खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत २.३५ अब्ज घनफुटाने (टीएमसी) घटला आहे. गतवर्षी याच कालावधीत चारही धरणे १०० टक्के भरलेली असताना २९.१५ टीएमसी पाणीसाठा होता. सध्या तो २६.८० टीएमसीवर म्हणजेच ९१.९४ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला पाणी नियोजनाचे आव्हान पेलावे लागणार आहे.