
पुणे - खडकवासला धरणातून वारजे केंद्राकडे येणारी मोठी जलवाहिनी फुटल्याने कोथरूड, बावधन, येरवडा, पाषाण यासह इतर भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. जलवाहिनी दुरूस्तीचे काम सुरू असून, शनिवारी (ता.२२) या भागात नियमित पाठपुरवठा होईल असे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.
खडकवासला येथून वारजे जलकेंद्रापर्यंत १६०० मिमीच्या दोन जलवाहिन्यांमधून पाणी पुरवठा केला जातो. आज (ता. २१) दुपारी एकच्या सुमारास खडकवासला धरणाच्या जवळच एका जलवाहिनीस चीर पडून मोटे या प्रमाणात पाणी वाया जाऊ लागले.
याची माहिती मिळताच पाणी पुरवठा विभागाने जलवाहिनीतील पाणी बंद करून दुरूस्तीचे काम सुरू केले. सायंकाळ पर्यंत काम पूर्ण झाल्याने रात्रीपासूनचा पाणी पुरवठा सुरळीत झाला.
मात्र आज अचानक पाणी बंजकरावे लागल्याने त्याचा फटका शहरातील मोठ्या भागाला बसला.
कोथरूडमधील भुसारी काॅलनी, शास्त्री नगर, परमहंस नगर, चांदणी चौक, बावधन,बाणेर, बालेवाडी, पाषाण, येरवडा येथील हरी गंगा शांतीनगर, आंबेडकर वस्ती, भुगाव रस्ता याभागातील नागरिकांना फटका बसला.
गेल्या आठवड्यात शिवाजीनगर येथे शिमला ऑफिसच्या मागे जलवाहिनी फुटल्याने गणेशखिंड रस्त्याच्या दोन्ही बाजूचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला होता.
तर दोन दिवसांपूर्वी प्रभात रस्ता येथे सांडपाणी वाहिनीचे काम करताना जलवाहिनी फुटल्याने डेक्कन व शिवाजीनगर परिसरातील पाणीपुरवठा विकास झालेला होता. उन्हाळ्यामध्ये पाण्याची मागणी वाढत असताना जलवाहिनी फुटल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.