
पुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली असतानाच बुधवारीही (ता. २०) कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज आहे; तर रायगडसह पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असून, भारतीय हवामानशास्त्र विभागाने सर्तकतेचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे.