पुणे - शहरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पूर्वमोसमी सरींनंतर अखेर सोमवारी पुण्यात नैर्ऋत्य मॉन्सूनने अधिकृत हजेरी लावली. यामुळे हवामानात सुखद गारवा निर्माण झाला असला तरी, आगामी दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह शहराला मंगळवारी (ता. २७) ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.