Pune Weather : पुण्यात पावसाची विश्रांती; पुढील पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता
Monsoon Update : पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची विश्रांती असून, कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे; पुढील काही दिवस हवामान स्थिर राहण्याचा अंदाज आहे.
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. काही दिवस कमाल तापमान स्थिर राहणार असून, पुढील पाच दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.\