

पुणे, ता. २६ : शहरात सकाळी पावसाच्या हलक्या सरी, तर दुपारी कडक ऊन पडत असल्याने पुणेकरांना बदलत्या हवामानाचा अनुभव येत आहे. सकाळी आणि संध्याकाळी गारवा जाणवत असला, तरी दुपारी कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उकाडा वाढला आहे. या बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे.
बुधवारी (ता. २६) दुपारी दोनच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये पाच ते दहा मिनिटे पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यानंतर अचानक आकाश निरभ्र होऊन कडक ऊन पडले. त्यामुळे कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसवर गेले. दिवसभरातील या ऊन, पावसाच्या लपंडावामुळे नागरिकांना सकाळी गारवा, तर दुपारी उकाडा सहन करावा लागला.
बुधवारी शिवाजीनगर, एनडीए आणि चिंचवड परिसरात प्रत्येकी एक मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवसांत शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी-अधिक राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. शहरात हलक्या सरी, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
पावसाचा जोर
राज्यातही ओसरला
राज्यात पावसाचा जोर ओसरला असून, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाने विश्रांती घेतली आहे. कोकण-गोवा तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांची पिकांबाबतची चिंता कायम आहे. पुढील दोन दिवस राज्यात हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.