Pune Weather: पुण्यात थंडी वाढली; किमान तापमान १२.१ अंशांवर

Pune Records Season's Lowest Temperature at 12.1 Degrees Celsius : पुणे शहराचे किमान तापमान १२.१ अंश सेल्सिअसवर घसरल्याने यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी नोंद झाली आहे. पहाटे आणि रात्री गारवा वाढला असून, पुढील तीन ते चार दिवस तापमानात चढ-उतार होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
Pune experiences chilly mornings as the temperature drops to 12.1°C.

Pune experiences chilly mornings as the temperature drops to 12.1°C.

esakal

Updated on: 

पुणे : शहराच्या किमान तापमानात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने घट होत असून, रविवारी पारा १२.१ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. हे यंदाच्या हिवाळी हंगामातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले आहे. पहाटे आणि रात्री वाढलेल्या गारव्यामुळे नागरिकांची पावले आता उबदार कपड्यांकडे वळली आहेत. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांत तापमानात किरकोळ चढ-उतार होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...