Pune Weather: महाबळेश्वरपेक्षाही , पुण्याचे तापमान थंड, किमान तापमान ११.३ अंशांवर

Pune Weather Update : पुण्यात किमान तापमान ११.३ अंशांवर घसरल्याने थंडीचा जोर वाढला आहे. महाबळेश्वरपेक्षाही पुणे थंड असून सोमवारपासून तापमानात हळूहळू वाढ अपेक्षित आहे.
Pune records a minimum temperature of 11.3 degrees Celsius as cold conditions intensify.

Pune records a minimum temperature of 11.3 degrees Celsius as cold conditions intensify.

esakal

Updated on: 

पुणे : शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला असून, किमान तापमानात लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. २०) पुण्यात किमान तापमानाचा पारा ११.३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. विशेष म्हणजे, पुण्याचे किमान तापमान महाबळेश्वरपेक्षाही कमी नोंदविण्यात आले. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी शहरात गारठा अधिक जाणवत आहे. पुढील दोन दिवस हवामान प्रामुख्याने निरभ्र राहणार असून, तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नसल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

Loading content, please wait...