IMD Predicts Stable Weather for the Next Two Days: बांगलादेश आणि दक्षिण केरळच्या प्रणालीमुळे पुण्यात किमान तापमानात वाढ होऊन थंडी ओसरली आहे. पुढील दोन दिवस तापमान स्थिर राहणार असून नंतर पुन्हा घट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
पुणे : बांगलादेशच्या पूर्व भागात आणि आसपासच्या भागांत तसेच दक्षिण केरळच्या किनारपट्टी परिसरात चक्रीय वाऱ्यांची प्रणाली कायम आहे. या प्रभावामुळे किमान तापमानात वाढ झाली असून, शहरातील थंडी ओसरली आहे.