
Pune Rain Update
Sakal
पुणे : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने दोन दिवसांपासून पुन्हा हजेरी लावली आहे. शहरात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात जोरदार पावसाची शक्यता असल्याने रविवारी (ता. १४) ‘यलो’ ॲलर्ट देण्यात आला आहे.