
पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाने हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवसदेखील हवामानात फारसा बदल होणार नसल्याने हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. घाट विभागात मुसळधार पावसाची शक्यता असून, तिथे सोमवारी (ता. २८) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.