Pune Weather Update: दोन दिवसांनंतर पावसाची उघडीप; आज-उद्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज
Pune Rain: पुण्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर १४ व १५ जुलै रोजी घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर आठवडाभर पावसाने विश्रांती घेण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शहरात पावसाने उघडीप दिली आहे. उद्यापासून (ता. १४) दोन दिवस तुरळक ठिकाणी घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.