

Pune Weather
sakal
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट झाली आहे, तर पुढील दोन दिवस किमान व कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यामुळे शहरात गारठा वाढला असून, तो पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.