
Rain
पुणे - कोकणात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी शनिवारी (ता. ६) गणरायाला निरोप देण्यासाठी वरुणराजा हजेरी लावण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरातही शनिवारी आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.