पुण्यात दोन दिवस पावसाची शक्यता

पुण्यात दोन दिवस 
पावसाची शक्यता
Published on

पुणे, ता. १७ : गेल्या दोन दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात किंचित घट नोंदविण्यात येत आहे. तर पुढील पाच दिवसांत हवामानात फारसा बदल होणार नसल्याने तापमान स्थिर राहणार आहे. तसेच, पुढील दोन दिवसांत शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
शहर आणि परिसरात रविवारी (ता. १७) कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस इतके, तर किमान तापमान २५.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. सकाळी आणि दुपारी आकाश मुख्यतः निरभ्र होते. मात्र, सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण झाले. पुढील तीन ते चार दिवसांत कमाल आणि किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असून, ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले.
पुणे आणि परिसरात सोमवारी (ता. १८) कमाल आणि किमान तापमान स्थिर राहणार आहे. कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस, तर २५ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले जाण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, मंगळवारपासून (ता. १९) कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com