pune temperature
sakal
पुणे - गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात किमान तापमानात मोठी वाढ झाली होती. मात्र, शुक्रवारी (ता. २०) किमान तापमानात एक अंश सेल्सिअसने घट नोंदविण्यात आली. तर पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार असून, त्यानंतर पुन्हा किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.