Pune Weather: पुढील काही दिवसांत ;पुण्यात गारठा वाढणार

Pune Weather Update: पुण्यात पुढील तीन ते चार दिवसांत किमान तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी गारठा वाढण्याचा अंदाज आहे.
Pune is likely to experience cooler nights and early mornings as minimum temperatures drop.

Pune is likely to experience cooler nights and early mornings as minimum temperatures drop.

esakal

Updated on: 

पुणे: ऑक्टोबर महिना संपून नोव्हेंबर सुरू झाला, तरी पुणेकरांना अद्याप अपेक्षित थंडीची प्रतीक्षा आहे. दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री जाणवणारा हलका गारठा, असे संमिश्र वातावरण सध्या शहरात अनुभवायला मिळत आहे. मात्र, पुढील तीन ते चार दिवसांत किमान तापमानात घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

Loading content, please wait...