
Pune Weather Update : पुण्यात थंडी तीन दिवस कमी राहणार
पुणे : शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून किमान व कमाल तापमानात वाढ होत आहे. परिणामी, नोव्हेंबरमध्ये पडलेल्या थंडीचा जोर पुन्हा ओसरत आहे. पुढील दोन ते तीन दिवस थंडी कमीच राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
शहरात पारा हळू हळू वाढत आहे. त्यामुळे किमान तापमानात सरासरीपेक्षा चक्क पाच अंशांनी वाढ झाली आहे. शनिवारी (ता. ३) १५ अंशांच्या खाली असलेल्या तापमानात वाढ होत रविवारी शहरात १८.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सातत्याने तापमानातील वाढीमुळे सध्या दिवसा उकाडा जाणवू लागला आहे.
मात्र, पहाटे धुक्यांची हलकी चादर कायम आहे. पुढील दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहू शकते. त्यामुळे पुणेकरांना आता गारठ्याऐवजी काहीसा उकाडा जाणवू शकतो. तर आठवड्याभरात एखादं दुसऱ्या दिवशी शहर व परिसरात अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.